twitter button

कणा0 comments
This is one of my favourite marathi poems.It is one of those, that really help you bounce back on your feet. Do read.

"ओळखलत का सर मला?" पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.


क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
"गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन".

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!"


कवी :  कुसुमाग्रज 

0 comments:

Post a Comment

newer post older post

Recent Comments

Search This Blog