twitter button

आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम (भाग 1)



0 comments
शांताई, आम्हा नातवंडाना ही अगडमबगडमची गोष्ट बऱ्याचदा सांगायची. लहान असताना आमच्यासाठी ही होर्रोर गोष्टींमध्ये मोजली जायची. तसं पाहिल तर, ही गोष्ट, जर्मनीच्या 'रम्पलस्टिलस्कीन' नामक गोष्टीवर आधारित आहे. खरतर असं म्हणता येऊ शकेल, कि त्या गोष्टीचे, हा जणू मराठी  अनुवाद आहे. थोडे फार बदल केले आहेत. पण ओव्हरऑल ही गोष्ट ब्रदर्स ग्रिम्म च्या रम्पलस्टिलस्कीन सारखीच आहे, जी त्यांने १८१२ मध्ये 'चिल्ड्रन & हाउसहोलड टेल्स' या पुस्तकात पहिल्यांदा प्रकाशित केली.

अगडमबगडम

 फार फार पूर्वीची गोष्ट आहे ही. दूर देशाचा असतो एक राजा. तरुण, अन दिसायला जितका देखणा, तितकाच शूर-वीर. राजाला शोध असतो एका राणीचा. जी त्याच्या जोडीने राज्याचं कल्याण करू शकेल.

त्याच राज्याच्या, एका छोट्या गावात एक माणूस राहत असतो. त्याची स्वतःची  गिरणी असते.
त्याला एक सुंदर मुलगीही असते. ती त्याला गिरणी चालवण्यात मदत करत असते. पण या माणसाचे स्वप्नं असतं कि आपण खूप-खूप मोठ्ठ होयचं, खूप श्रीमंत बनायचं.  पण त्या गिरणीवाल्याला एक वाईट सवय असते. तो खूप थापा मारत असे, बढाया मारत असे, आणि असे लोकांना दाखवत असे, कि आपण कोण मोठ्ठे!.
 

तो सगळ्यांना काय थापा मारत असतो माहित आहे का? "माझी मुलगी गवतातून सोन्याचे धागे बनवू शकते हो! आता मी श्रीमंत होणार हो," असं सांगत असतो लोकांना. आधी लोक हसतात त्याला, मग समजावतात, तरीही हा काही थापा बंद करीत नाही.  हे पाहून ते चिडतात. त्याला व त्याच्या  थापांना कंटाळून गावकरी राजाच्या वाझीरांना या गिरणीवाल्याबद्दल अन त्याच्या गोष्टी जणू काही  खऱ्याच आहेत असे सांगतात. अश्या प्रकारे ही 'गवतातून सोन्याचे धाग्याची' गोष्ट राजा पर्यंत पोचते. आधी त्याचा विश्वास नाही बसत या गोष्टीवर. पण मग वाझीरांच्या सांगण्यावरून तो ठरवतो कि आपण या गिरणीवाल्याला भेटायचे. जर त्याची ही गोष्ट खोटी निघाली, तर खोटा बोलण्याचा गुन्हा केल्याबद्दल त्याला तुरुंगात टाकायचे, म्हणजे सगळ्यांना कळेल कि खोटे बोलायचे नाही.
 

या विचाराने, राजा अन त्याचे वझीर गावात येतात अन गिरणीवाल्याला  भेटतात. राजा म्हणतो, "ऐक गिरणीवाल्या! आम्हाला असे कळले आहे कि तुझी मुलगी गवतामधून सोन्याचे धागे बनवू शकते. तर आम्ही हे पारखणार आहोत. आज रात्री तिने राजमहालात यावे अन तिला जे गवत दिले जाईल, त्याचा वापर करून तिने सोन्याचा धाग्याचे रीळ बनवून आम्हाला द्यावे. तिला या कामासाठी आख्खी रात्र आहे. तिला जर हे जमलं, तर तुला बक्षिस देऊ, नाहीतर तिला तुरुंगात टाकू आणि तुझी, खोटा सांगितल्याबद्दल जीभ छाटू!" हे ऐकून गिरणीवाला व त्याची मुलगी, दोघेही घाबरतात. राजाला नाही पण म्हणता येत नाही. तो आपल्यावर किती अन्याय करतोय, म्हणून रडताही  येत नाही...कारण ही अफवा तर त्यानेच (गिरणीवाल्याने) पसरविलेली असते. करायचे तर काय आता? अशी चिंता दोघे बाप-लेकीला लागते.
 

शेवटी मुलगी म्हणते, "बाबा, मी आज रात्री महालात जाईन. तिथे रात्रभर देवाची प्रार्थना करेन.... दुसऱ्यादिवशी राजाला सगळं खरा सांगेन. मग पुढे पाहू काय होते ते. शिक्षा मिळेल ती मिळेल, पण तुमच्या या गोष्टी तरी थांबतील."

असं सांगून
गिरणीवाल्याची मुलगी राजमहालाची वाट पकडते. महालात पोचताक्षणी दोन दास्या तिला एका खोलीत घेऊन जातात. दरवाजा उघडल्यावर ती बघते, पूर्ण खोली गवताने भरलेली अन एका बाजूला एक छोटासा चरखा...सोन्याचे सूत काढायला! ती बिचारी खूपच घाबरते. दास्या गेल्यानंतर ती एका कोपऱ्यात बसून रडू लागते. 

एक फटाका फुटल्यासारखा आवाज ऐकू येतो येतो. ती एकदम दचकते अन वळून पाहते तर काय!! जणू आगीच्या चेंडू मधून एक बुटका बाहेर पडतो. अन हा बुटका दिसायला कसा असतो! जेमतेम तीन फुटाचा बुटला,  मोठे मोठे कान त्याचे, गोल-गार-गरीत मोठे डोळे, लांब टोके दार नाक, आणि चेहऱ्यावर बेरकी हास्य. या बूटक्याला एक छोटी टोक वाली दाढी पण असते, व त्याने डोक्यावर एक हिरव्या रंगाची मोठी त्रिकोणी टोपी, व अंगात हिरवे कपडे. अन पायात लाल ठिपक्यांचे मोजे आणि ब्राउन बूट घातले असतात. बिचारी मुलगी त्याला पाहून आश्चर्यचकित होते. तिच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. एकदम गप्प बसून त्याला बघू लागते.


Continued on the next post: आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम  (भाग 2)
**Please Note: images posted on the blog are in the public domain, and a result from image search on a search engine.

0 comments:

Post a Comment

newer post older post

Recent Comments

Search This Blog