twitter button
Showing posts with label Marathi favorites. Show all posts
Showing posts with label Marathi favorites. Show all posts

बडबड गीत



1 comments
This one is for my nieces!!


इटुकल्या-बिटुकल्या
माझ्या पाठी पडला चटुकल्या
चटुकल्याने फेकला पाव-पाव 
आणि माला म्हणतो धाव-धाव
धाऊन- धाऊन दामले रे
न झाडापाठी जाउन लपले रे

झाडात शिरली मधमाशी
ऐक रे  ती शिंकते कशी 
आक्षी! आक्षी! आक्षी!


अबोली गबोली
गुलाब आणी चंपा कळी
फुले वेचीते शुंदडी
बागेत आला कबू
आणि म्हणाला गुटरगू
शुंदडीने फुले उचलली 
आणि घरी धुम ठोकली


ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजला फोन
सांगा पाहू बोलताय कोण?
बाबा बोलते तुमची बबू
आजी नाही देत मला खाऊ
ताई पण खोडी काढते
जाता-येता बुक्का मारते
बाबा लवकर घरी या
आजीला थोडा दम द्या
ताईला जरा "वा" करा
आणि माझ्याशी खेळा जरा
प्लान आपला आहे परफेक्ट
सांगू नका कुठे आपलं सीक्रेट 

Favourite videos: Fu bai Fu



1 comments
Fu bai Fu is a program on Zee mArathi, wherein various marathi actors present their comedy skits. Winner gets a prize. Sometimes, the skits are good, and sometimes they are really bad.

Following are my favourites:

Anand Ingle & Vishakha Subhedar



Anand Ingle Kshiti Jog



Anand Ingle & Kishori Godbole




Atul Todankar & Anshuman Vichare



Atul Todankar & Anshuman Vichare




Vaibhav Mangle & Kshiti Jog



Hope you have fun watching them

दमलेल्या नंदिनीची कहाणी



2 comments
The background: Balancing work and home is not an easy task.
Hats off to all the women, who manage the tight-rope walk.

Many people think that things are a little manageable out of India, what with frozen/semi cooked foods, 40 hours week, lower frustration levels, so on.
Well, the answer is no...its certainly not easy. Especially, if any one has the amount of travel like the way I have (more than an hour one way). After getting thoroughly exhausted in the office, it becomes difficult (though not impossible, as many of my friends here are excellent home makers/managers too) to come home and dish out a fresh square meal.

The story: So one fine day, tired after pasta, daal-khichadis, idli-sambhars, my husband, Aniket, said to me, after a particularly exhausting (my) day at work, one thing, he should not have......
"कांटाळ आला इडली-पिडली खाउन. किती दिवसात पोळी-भाजी नाही खाल्ली. तुला काय त्रास होतो गं...बाकीच्या तुझ्या मैत्रिणी तर बनवतात कि proper जेवण!"

Well, that is the inspiration, behind this विडंबन of a part of the song.

The song: दमलेल्या बाबाची कहाणी is one of my favorite songs, and I hope its creators don't take an offense at my humble remix. Read the lyrics and sing along.
पहाटेच उठलेली एक महाराणी,
गॅसवर ठेवलेले चहासाठी पाणी ||2||
ला ला लाला ला ला ला ला ssss  
रोजचेच आहे सारे काही आज नाही,
लवकर-लवकर अवरायाला जमतच नाही,
घरातून निघताच असते  पळत,
ट्राम सुटली तर जावे लागते चालत,

सांगायची आहे अरे नवर्या मुला
दमलेल्या नंदिनीची कहाणी तुला
ला ला ला ला ला ला ला ला ssss

Amsterdam
च्या नगरात थंडी होती भारी
कुडकुडलेली नंदी करी बसेसची वारी  ||2||
रोज सकाळीच नंदी निघतांना बोले,
जेवण करायचे काल राहुनिया गेले,
जमलीच नाही काल भाजी मला जरी,
आज तरी करणार खीर आणि पुरी.
कुकिंग बुक्सच्या जंगलामध्ये मारू मग फेरी,
रुचिराचीपाने अन इंटरनेटची करी,
नाहीतर जमेल फक्त वरण-भात मला,
दमलेल्या नंदिनीची कहाणी तुला.

------------------------------------------------------
[The prose part] ऑफिसात उशिरा मी असते बसून,
भंडावले डोके, गेले कामात बुडून.
बॉस तर घरी कधिच गेला रे पळून,
काम सोडून कशी मी येऊ रे निघून.
अश्या वेळी काय सांगू काय-काय होते,
अश्या वेळी काय सांगू काय-काय होते,
गरम चहा-पोह्याची आठवण येते.
वाटते कि काम टाकुन घरी परत यावे,
वाटते कि काम टाकुन घरी परत यावे,
आरामात TV समोर सोफ्यावर बसावे.
थंड पाणी देत तू  बोल जरा माझ्याशी
नंतर जेवण बनवायला लागेन पटदिशी.
-------------------------------------------------------------

भन्नाट एक फ़र्माइश करशील काही,
बनवतांना भान मला उरणार नाही. ||2||
घड्याळाचे ठोके मग बोलतील काही,
म्हणता-म्हणता संध्या सुद्धा सरणार बाई.
तरी सुद्धा दोघे जण खाऊ खाऊ असा,
मिसळीचा कट किंवा नुसताच रस्सा.
सांगायची आहे अरे नवर्या मुला
दमलेल्या नंदिनीची कहाणी तुला

THE ORIGINAL SONG



*Ruchira is an age old cooking book with recipes of every Maharashtrian recipe, starting from How to boil rice, to making Chirotes.

आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम (भाग 1)



0 comments
शांताई, आम्हा नातवंडाना ही अगडमबगडमची गोष्ट बऱ्याचदा सांगायची. लहान असताना आमच्यासाठी ही होर्रोर गोष्टींमध्ये मोजली जायची. तसं पाहिल तर, ही गोष्ट, जर्मनीच्या 'रम्पलस्टिलस्कीन' नामक गोष्टीवर आधारित आहे. खरतर असं म्हणता येऊ शकेल, कि त्या गोष्टीचे, हा जणू मराठी  अनुवाद आहे. थोडे फार बदल केले आहेत. पण ओव्हरऑल ही गोष्ट ब्रदर्स ग्रिम्म च्या रम्पलस्टिलस्कीन सारखीच आहे, जी त्यांने १८१२ मध्ये 'चिल्ड्रन & हाउसहोलड टेल्स' या पुस्तकात पहिल्यांदा प्रकाशित केली.

अगडमबगडम

 फार फार पूर्वीची गोष्ट आहे ही. दूर देशाचा असतो एक राजा. तरुण, अन दिसायला जितका देखणा, तितकाच शूर-वीर. राजाला शोध असतो एका राणीचा. जी त्याच्या जोडीने राज्याचं कल्याण करू शकेल.

त्याच राज्याच्या, एका छोट्या गावात एक माणूस राहत असतो. त्याची स्वतःची  गिरणी असते.
त्याला एक सुंदर मुलगीही असते. ती त्याला गिरणी चालवण्यात मदत करत असते. पण या माणसाचे स्वप्नं असतं कि आपण खूप-खूप मोठ्ठ होयचं, खूप श्रीमंत बनायचं.  पण त्या गिरणीवाल्याला एक वाईट सवय असते. तो खूप थापा मारत असे, बढाया मारत असे, आणि असे लोकांना दाखवत असे, कि आपण कोण मोठ्ठे!.
 

तो सगळ्यांना काय थापा मारत असतो माहित आहे का? "माझी मुलगी गवतातून सोन्याचे धागे बनवू शकते हो! आता मी श्रीमंत होणार हो," असं सांगत असतो लोकांना. आधी लोक हसतात त्याला, मग समजावतात, तरीही हा काही थापा बंद करीत नाही.  हे पाहून ते चिडतात. त्याला व त्याच्या  थापांना कंटाळून गावकरी राजाच्या वाझीरांना या गिरणीवाल्याबद्दल अन त्याच्या गोष्टी जणू काही  खऱ्याच आहेत असे सांगतात. अश्या प्रकारे ही 'गवतातून सोन्याचे धाग्याची' गोष्ट राजा पर्यंत पोचते. आधी त्याचा विश्वास नाही बसत या गोष्टीवर. पण मग वाझीरांच्या सांगण्यावरून तो ठरवतो कि आपण या गिरणीवाल्याला भेटायचे. जर त्याची ही गोष्ट खोटी निघाली, तर खोटा बोलण्याचा गुन्हा केल्याबद्दल त्याला तुरुंगात टाकायचे, म्हणजे सगळ्यांना कळेल कि खोटे बोलायचे नाही.
 

या विचाराने, राजा अन त्याचे वझीर गावात येतात अन गिरणीवाल्याला  भेटतात. राजा म्हणतो, "ऐक गिरणीवाल्या! आम्हाला असे कळले आहे कि तुझी मुलगी गवतामधून सोन्याचे धागे बनवू शकते. तर आम्ही हे पारखणार आहोत. आज रात्री तिने राजमहालात यावे अन तिला जे गवत दिले जाईल, त्याचा वापर करून तिने सोन्याचा धाग्याचे रीळ बनवून आम्हाला द्यावे. तिला या कामासाठी आख्खी रात्र आहे. तिला जर हे जमलं, तर तुला बक्षिस देऊ, नाहीतर तिला तुरुंगात टाकू आणि तुझी, खोटा सांगितल्याबद्दल जीभ छाटू!" हे ऐकून गिरणीवाला व त्याची मुलगी, दोघेही घाबरतात. राजाला नाही पण म्हणता येत नाही. तो आपल्यावर किती अन्याय करतोय, म्हणून रडताही  येत नाही...कारण ही अफवा तर त्यानेच (गिरणीवाल्याने) पसरविलेली असते. करायचे तर काय आता? अशी चिंता दोघे बाप-लेकीला लागते.
 

शेवटी मुलगी म्हणते, "बाबा, मी आज रात्री महालात जाईन. तिथे रात्रभर देवाची प्रार्थना करेन.... दुसऱ्यादिवशी राजाला सगळं खरा सांगेन. मग पुढे पाहू काय होते ते. शिक्षा मिळेल ती मिळेल, पण तुमच्या या गोष्टी तरी थांबतील."

असं सांगून
गिरणीवाल्याची मुलगी राजमहालाची वाट पकडते. महालात पोचताक्षणी दोन दास्या तिला एका खोलीत घेऊन जातात. दरवाजा उघडल्यावर ती बघते, पूर्ण खोली गवताने भरलेली अन एका बाजूला एक छोटासा चरखा...सोन्याचे सूत काढायला! ती बिचारी खूपच घाबरते. दास्या गेल्यानंतर ती एका कोपऱ्यात बसून रडू लागते. 

एक फटाका फुटल्यासारखा आवाज ऐकू येतो येतो. ती एकदम दचकते अन वळून पाहते तर काय!! जणू आगीच्या चेंडू मधून एक बुटका बाहेर पडतो. अन हा बुटका दिसायला कसा असतो! जेमतेम तीन फुटाचा बुटला,  मोठे मोठे कान त्याचे, गोल-गार-गरीत मोठे डोळे, लांब टोके दार नाक, आणि चेहऱ्यावर बेरकी हास्य. या बूटक्याला एक छोटी टोक वाली दाढी पण असते, व त्याने डोक्यावर एक हिरव्या रंगाची मोठी त्रिकोणी टोपी, व अंगात हिरवे कपडे. अन पायात लाल ठिपक्यांचे मोजे आणि ब्राउन बूट घातले असतात. बिचारी मुलगी त्याला पाहून आश्चर्यचकित होते. तिच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. एकदम गप्प बसून त्याला बघू लागते.


Continued on the next post: आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम  (भाग 2)
**Please Note: images posted on the blog are in the public domain, and a result from image search on a search engine.

आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम (भाग 2)



0 comments
 Click here to read the previous part.

मग हा बुटका त्याच्या खरखरीत आवाजात तिला सांगतो, "मला माहित आहे तू संकटात आहेस! मी तुला मदत करू शकतो. मला सांग काय त्रास आहे तुला आणि मी तुझी मदत करतो."
मुलगी आणखीनच घाबरते अन म्हणते, "मला असं काही त्रास नाही कि मला तुझी मदत लागेल"
"विचार कर, मी गेलो निघून...तर मग तू जाशील तुरुंगात आणि तुझ्या बाबाची जीभ जाईल छाटली," अशी आठवण,
बुटका करून देतो तिला. मुलगी विचारते, "तू कोण आहेस? तुला हे सर्व कसे ठाऊक?"
"ते तुला समजायची गरज नाही. ह्या गवतातून सोन्याचे धागे बनवणे गरजेचे आहे आत्ता"
"तू जादुगार आहेस का? मला तू मदत करशील का?"
बुटका म्हणतो, "मला जादू येते, होय. मी तुला मदत करेन, होय.....पण मला परत काय मिळणार होय?" "या संकटातून मला आणि बाबांना वाचाव. तुला पाहिजे ते देऊ, सोने, चांदी, कपडे, वाट्टेल ते," असे वचन मुलगी देते. "मी तुझी मदत करेन, आणि मला काय हवंय तुझ्याकडून, ते, मी, वेळ आली कि मागेन तुझ्याकडे. बघ, नीट विचार कर, नंतर 'नाही' म्हणता येणार नाही होय. नाही म्हणालीस तर जादू करेन आणि तुला त्रास देईन. खरं बोलतोय मी. ही
थट्टा नाही होय. कि खोटं नाही होय."
 

 "ठीक आहे. तुला पाहिजे तेव्हा, आणि पाहिजे ते, मी देईन. नाही म्हणणार नाही. आता मला या संकटातून सोडव".
हे ऐकल्यावर बुटका खिश्यातून एक जादूची पावडर काढतो अन तिच्यावर फुंकतो. वास येताच, मुलगी झोपून जाते.
एकदम दुसऱ्या दिवशी उठते. तर पाहते काय. सोन्याच्या धाग्यांच्या रिळांचा ढीग. तिला समजत. काल जे झाले, ते स्वप्नं नसून, खरे होते. दास्या येतात अन तिला राजा समोर नेतात. राजा अन त्याचे वझीरही आश्चर्यचकित झाले असतात. पण आज्ञा पूर्ण केल्यामुळे ते तिला तुरुंगात नाही टाकू शकत आणि तिला घरी जायची परवानगी देतात. घरी तिचे बाबा काळजीत असतात. तिला सही-सलामत पाहिल्यावर ते खुश होतात. मुलगी आपल्या बाबांना बूटक्याचा  सगळा प्रकार सांगते. थोडे दिवस जातात. बुटका काही येत नाही. म्हणून ते दोघे आणखी खुशीत राहतात.

 पण काही दिवसांने, राजाचे शिपाई येतात, मुलीला महालात घेऊन जायला. ही मुलगी काही चेटूक तर नाही करत ना? हे पहावयास, राजा ने तिला परत बोलावले असते. तीच खोली...तेच गवत...तोच चरखा आणि रात्र. आता मात्र मुलगी बुटक्याचा विचार करू लागते. बराच वेळ होतो, तो काही येत नाही. तर ती हमसून रडू लागते. आणि मग एकदम, अचानक, हवेमधून  बुटका येतो. परत तो-तिला काही हवं ते मागून घेईन या बोलीवर.....मदत करतो.
दुसऱ्या दिवशी राजा, वझीर आणि दरबारी
आश्चर्यचकित होतात. पण कोणी काही बोलू शकत नाही. राजा गिरणीवाल्याला आता महालात बोलावतो, आणि म्हणतो "तू ज्या गोष्टी सांगायच्या, त्या तर खऱ्याच आहेत.बोल तुला काय बक्षिस हवंय"
"माझ्या मुलीला तुम्ही राणी बनवा....या शिवाय मला काही नको," असं गिरणीवाला राजाला आग्रह करतो.
 

"ठीक आहे," राजा म्हणतो, आणि गिरणीवाल्याच्या मुलीचं अन राजाचं लग्न होतं. राजाला जासी राणी हवी असते, तशी ही मुलगी असते. दिसायला सुरेख, आणि न्यायवादी. दोघेही राज्याला मोठे व छान करण्यामध्ये जुंपतात.

पण काही दिवसांपासून
राणीला रात्री, नीट झोप लागत नसते....तिला बूटक्याचे स्वप्नं सारखे पडत असते, अन त्याचे शब्द, "मी, वेळ आली कि मागेन तुझ्याकडे. बघ, नीट विचार कर, नंतर 'नाही' म्हणता येणार नाही होय. नाही म्हणालीस तर जादू करेन आणि तुला त्रास देईन. खरं बोलतोय मी. ही थट्टा नाही होय. कि खोटं नाही होय" तिला सारखे आठवू लागतात. ती बेचैन होऊ लागते. अन एका रात्री, तिला आवाज येतो....फटाका फुटण्याचा आणि आगीच्या चेंडू मधून तोच बुटका बाहेर पडतो. राणी खूपच घाबरते. ती घाबरत त्याला विचारते, " काय हवंय तुला?"
बुटका हसतो, अन म्हणतो "राणी गं राणी, विसरली नाहीस ना गं मला?"
"नाही रे, नाही विसरले तुला. तुला काय हवंय, ते पटकन सांग. सोनं-चांदी-दागिने-पैसे-कपडे, काय हवय तुला?" बुटका नुसता हसतो, म्हणतो, "मला हे काही नको. पण तुला जे बाळ होईल त्याला मी घेऊन जाईन." राणी आणखीनच घाबरते..."असं काय म्हणतोयस? मी माझं बाळ नाही देणार तुला. तू दुसरा काही तरी माग". बुटका चिडतो, राणीला ओरडतो, "नाही म्हणू नकोस. मला राग आला तर तुलाच त्रास होईल. नीट विचार कर राणी, तू वचन दिले आहेस मला. मी काही दिवसांनी परत येईन आणि मग मला काय ते सांग."  


राणी बऱ्याच दिवस विचार करते. काही दिवसांनी तिला कळते कि तिला एक छोटेसे बाळ होणार आहे. सारे राज्य आनंदाने वा उत्सुकतेने बाळाची वाट पाहू लागतो. पण राणी आणखीनच बेचैन होउ लागते. कोणाला काही काळात नाही काय चिंता राणीला सतावते.
 

एके रात्री, सगळे झोपल्यावर, बुटका परत येतो, अन राणीला सांगतो "मी तुझ्या बाळाला घेऊन जाईन. मी तुला त्याच खोलीत भेटेन जिथे तूला गवता मध्ये पूर्वी बसवलं होतं.  तू मला थांबवू नकोस, नाहीतर मी जादू करून सगळं राज्य उध्वस्त करेन". राणी खूप मिन्नतवाऱ्या करते, पण बुटका नाही ऐकत आणि अद्रुष्य होऊन जातो. काही दिवसांनी राणीला बाळ होते. राजाला खूप आनंद होतो. सगळ्या राज्यात तो कौतुकाने बक्षिस वाटू लागतो.

अन एका रात्री, बुटका परत येतो. "राणी, मला माझं बक्षिस हवंय. काही झालं तरी, मी तुझा बाळ नेणार आहे".
"अरे, मी माझ्या बाळाला नीट पहिल पण नाही रे, आज नको नेउस त्याला".
"ठीक आहे. मी उद्या येतो."
राणी असते चतुर. ती विचार करते...कि आपण रात्री परत, बूटक्याशी बोलायचे अन त्याच्या डोक्यातून बाळाचे खूळ काढायचे. दुसऱ्या रात्री, बुटका त्याने सांगितलेल्या खोलीत येतो ,"राणी, मला माझं बक्षिस हवंय. काही झालं तरी, मी तुझा बाळ नेणार आहे".
राणी म्हणते, " माझ्या बाळाला नको नेउस. तुला पाहिजे ते दुसरा काहीही ने."
"नाही मला तुजे बाळच हवंय"
"तू दुसरा काही म्हणशील ते मी करेन...पण माझ्या बाळाला नको नेउस"
"ठीक आहे. मला विचार करू दे"
"बरं, तर राणी....माझं नाव सांग, आणि बाळ तुझ्याकडेच राहील. नाही सांगू शकलीस तर मी नेईन". राणी ला वाटतं, कि बरं झालं...नाव काय पटकन सांगता येईल.
ठरवलेल्या रात्री बुटका येतो...पण राणी काही त्याचं नाव नाही सांगता येत. मग भरपूर विनवण्या करून राणी एक रात्र घेते. तो बुटका तिथून अद्रुष्य झाल्यावर, राणी महालातून चूप-चाप बाहेर पडते. कुठे दिसतोय का बुटका, म्हणून त्याचा शोध घेउ लागते. तर तिला थोड्या दूर हालचाल दिसते....
पुढे जून पाहते तर कोण तरी भराभर चालत जाताना दिसतं. 
 हा बुटका कि काय, हे पाहायला ती आणखी पुढे जाते...तर खरच....बुटका जवळच्या जंगलाच्या दिशेने पळत असतो.
जंगलात पोचल्यावर....एका जुन्या झाडाच्या खाली तो शेकोटी पेटवतो आणि त्या भोवती गाऊ अन नाचू लागतो.


"नाव कसे ममं गमतीचे, अगडमबगडम छान असे
ठावूक नाही कोणाला, कळेल कैसे राणीला
राणीचा त्या बाळाला आणीन मी येथे.


 हे गाणे तो त्याच्या भयानक खरखरीत आवाजात गात असतो. राणी सगळं लांबून पहात असते अन ऐकत असते.  बूटक्याचे नाव कळल्यावर ती खूप खुश होते. परत महालात जावून आरामात झोपते. दुसऱ्या रात्री बुटका परत येतो आणि ठरवलेल्या खोलीत भेटतो, आणि म्हणतो, "राणी गं राणी, सांग माझे नाव काय....नाहीतर तुझ्या बाळाला मी नेतो!"

राणी म्हणते "तुझा नाव.......रघु, कि बाळू कि राम कि श्याम कि राघव कि माधव?"
बुटका खूप खुश होतो. राणीला आपलं नाव ओळखता येत नाही, ह्याचा त्याला आनंद होत असतो, "यातलं एक पण नाही....दे तुझ्या बाळाला माझ्याजवळ"


मग राणी म्हणते, "थांब रे जरा
अगडमबगडम! होय, तुझा नाव आहे ना ते-अगडमबगडम!"
राणीने आपलं नाव ओळखलं, हे समजल्यावर,
अगडमबगडमला धक्काच बसतो. 
अन त्याला खूप-खूप राग येतो. तो ओरडतो, "तू माझं नाव ओळखलस!!! तू माझं नाव ओळखलस!!!" असं म्हणता म्हणता तो तयाचा पाय जमिनीवर जोरात आपटतो आणि काय होतं!! अबबब एक मोठी दरी तयार होते, आणि त्यात अगडमबगडम पडतो....तो पडल्यावर, तो खड्डा एकदम बंद होतो....जणू काहीच झाले नाही असे.

राणी पण सुटकेचा श्वास सोडते आणि कानाला हात लावते...खोटे बोलायचे नाही, लपवायचे नाही, आणि अनोळखी लोकांकडून काद्धी मदत घ्यायची नाही.

आठवणीतल्या गोष्टी: खडका कोथिंबीर (भाग 1)



2 comments
आजी कडून गोष्ट ऐकण्याची  मज्जा वेगळीच आहे बुवा!!  कधी घास भरवतांना, कधी रात्री थोपटत, कधी बागेत झोपाळ्याला झोका देतांना!

शांताईने (माझी आजी) मला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. गोष्टी सांगतांना शांताई मला एका वेगळ्याच दुनियेत, अडव्हेनचर ट्रीप वर, न्यायची. एक जादूची नागरी, राजा, त्याची आवडती राणी आणि नावडती राणी, प्रजा, राजकन्या-राजपुत्र, युद्ध, खजिना, आणि या सगळ्यांना बांधणारा एक अफलातून जादूचा धागा.

अशीच एक गोष्ट तिने सांगितलेली, मला अजून आठवते.

खडका कोथिंबीर

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.

आटपाट नगरीचा एक राजा होता. राजा शूर-वीर अन दयाळू होता. त्याच्या प्रजेचेही त्याच्यावर खूप प्रेम होते. अश्या या राजाची एक सुंदर राणी होती. राणी दिसायला इतकी सुंदर, जणू एक परीच ती! जितकी दिसायला सुंदर, तितकीच स्वभावाने निर्मळ. त्यांना दोन गोड छोटी मुलं...मोठी  राजकन्या आणि धाकटा राजकुमार!! दोघेही आई-बाबा आपल्या मुलांवर खूप प्रेम करीचे. राणी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायची, गाणी शिकवायची आणि भरपूर खेळायची त्यांच्याशी.

पण एके दिवस असे होते कि राणीला बरे नाहीसे होते. वैद्यबुवा येतात, औषधे देतात, काढे पाजतात, तरी राणी काही बरी होईना.  महालात नैराश्य घर करून बसतं. राजकुमार आणि राजकन्या काय! कोणालाच काळात नव्ह्तं कि राणी ला काय झालय. अशेच कघी दिवस गेले. आणि एके दिवस राणी देवाघरी गेली. सारी आटपाट नगरी दुःखात बुडते. राजा तर तहान-भूकही विसरतो. नुसताच विचार करत बसायचा. राजकुमार आणि राजकन्येला समजेना कि आपली आई आपल्याला सोडून देवाकडे का गेली? बरेच दिवस असे गेले.

पण राज्याचा कार्यभार परत सुरळीत चालू व्हायलाच हवा! राजा आणि त्याच्या मुलाचं आयुष्यही पुढे नीट जावं म्हणूनच तर दरबारातल्या वझीरांनी राजाला दुसरा लग्न करायला सांगतात. आणि नवीन राणी राजमहालात येते. राजकुमार आणि राजकन्येला नवीन आई मिळते.

ही नवीन राणी देखील दिसायला सुरेख होती. पण स्वार्थी होती. तिला  राजकुमार आणि राजकन्येचा उगाच खूप राग यायचा. सगळे दरबारी, राजकुमार आणि राजकन्येवर खूप माया करायचे. हे तिला सहन नाही व्हायचे. राजा समोर त्यांच्यावर  माया करायची, पण मनातल्या मनात, त्यांना महालातून बाहेर कसं काढून टाकता येईल असा विचार करायची.

एके दिवशी राणीला समझते कि ती आई होणार आहे. मग तर तिला राजकुमार आणि राजकन्येचा आणखी राग येउ लागतो. काही दिवसातच राजा एक युद्ध लढायला निघून जातो. तर राणी छोट्या राजकुमार आणि राजकन्येला त्रास द्यायला सुरुवात करते. त्यांना उपाशी ठेवते, बरीच कामे करायला लावते....जणू ते राजकुमार व राजकन्या नसून, कोणी महालातले नोकर आहेत. आणि मग एके दिवशी राणी निश्चय करते, कि राजकुमार आणि राजकन्येला मारून टाकायचे. म्हणजे राणीला जे बाळ होईल, त्याला सगळ राज्य मिळेल ना! एके दिवशी ती राजकुमार आणि राज्कान्येसाठी खाउ बनवते...पण त्याच्यात विष मिसलावते. राजकुमाराला खूप भूक लागली असते, म्हणून तो ताई ला विचारतो, "मला कि नई खूप भूक लागली आहेय ती...मी खाउ का तुझा खाउ?". हे ऐकून राजकन्या आपलं वाटा त्याला देते....पण खातच, राजकुमार निपचित पडतो....ना हलत न चालत.

महाल परत  दुःखात बुडतो....राजकन्या एकटी पडते...राजाही दूर देशी युद्ध-भूमीवर असतो.......पण राणीला बरच वाटत असतं. ती विचार करते कि आता राजकन्येला इतका त्रास देउया कि ती स्वतः पळून जाईल. राजकन्या आता दासी सारखी राहू लागते. कोणी तिच्या बाजूने काही बोलले, तर त्याला काळ-कोठडीत बंद करते. सगळे घाबरून असतात राणीला. एके दिवशी राणी फर्मान काढते कि राजकन्येचे जेवण बंद करायचे, कारण ती नीट काम करत नाही. राजकन्या खूप रडते. पण कोणी काही बोलू शकत नाही, व करू शकत नाही.

त्या रात्री राजकन्येच्या स्वप्नात येतो तिचा भाऊ.......छोटा राजकुमार!
तो म्हणतो, "ताई तुला भूक लागली कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे एक मोठा खडक आहे....मी कोथिंबीर म्हणून उगवेन. तू खा."

राजकन्येला खूप भूक लागली असते...ती, भवानी सांगितल्या प्रमाणे दररोज खडका जवळ जाउ लागते....आणि खरचकी!!!! तिथे कोथिंबीर असते. ती खूप मनसोक्त खाते. बरेच दिवस होतात राजकान्येत काही बदल दिसत नाही म्हणून राणी तिच्या पाठी गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतका खाते कि अजून टुनटुणित आहे?

जेव्हा राणीला सगळा हा कोथिम्बीरीचा प्रकार कळतो, तेव्हा तिला खूप खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो खडक व ती कोथिंबीर, दोन्ही जाळून टाकायचा आदेश देते. राजकन्या जेव्हा परत जाते तीठेय खायला तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, ताई-बाई, मला तुझी खूप खूप काळजी वाटते ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे मी मासा बनून तुज्या कडे तलावातले खाद्य घेउन येईन....तू खा."

(Continued on to the next post)

आठवणीतल्या गोष्टी: खडका कोथिंबीर (भाग 2)



0 comments
(Continued from part 1......)


त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, ताई-बाई, मला तुझी खूप खूप काळजी वाटते ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे मी मासा बनून तुज्या कडे तलावातले खाद्य घेउन येईन....तू खा." ती, भवानी सांगितल्या प्रमाणे तलावा जवळ जाते....आणि खरच!!!! तीथे एक सोनेरी रंगाचा मासा तोंडात तलावातली वनस्पती घेउन काठाजवळ थांबला असतो. ती खूप मनसोक्त खाते. राजकन्येची ही तलावाची दररोजची वारी पाहून राणीला संशय येतो; आणि म्हणून राणी तिच्या (राजकन्येच्या) पाठी परत गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतके खाते कि अजून टुनटुणित आहे? जेव्हा राणीला सगळा हा माश्याचा प्रकार कळतो, तेव्हा तिला खूप-खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो मासा पकडायला सांगते. राणी स्वतः मासा शिजवून लोकांना खायला घालते.

राजकन्या जेव्हा परत तलावा जवळ जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते. त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, माझे गोड ताये, काळजी नको करूस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या बागेत ये. तिथे एक मोठे आंब्याचे झाड आहेय. तीठेय खालच्या फांदीवर मी पोपट-रुपात असेन. तुला खायला फळं आणेन. तू खा." 
राजकन्या, भावानी सांगितल्या प्रमाणे आंब्याच्या झाडाकडे जाते....आणि खरच!!!! तीथे एक सुंदर पोपट अपुल्या चोचीत फळं घेउन वात पाहत बसला असतो. ती खूप मनसोक्त खाते. बरेच दिवस होतात राजकान्येत परत काही बदल दिसत नाही म्हणून राणी तिच्या पाठी परत गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतका खाते कि अजून टुनटुणित आहे? जेव्हा राणीला ह्या पोपटाबद्दल समझतं, तेव्हा तिला खूप-खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो पोपट पकडून मारायला सांगते.राजकन्या जेव्हा परत बागेत जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, माझे तायडे, रडू नकोस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या देवळात ये. तिथे मी मोर बनून तुझ्याकडे मंदिरातला घेउन येईन....तू खा."
भावानी सांगितल्या प्रमाणे राजकन्या देवळात जाउ लागते.....आणि खरच!!!! तीथे एक सुंदर मोर अपुल्या चोचीत देवाचा प्रसाद घेउन राजकन्येची वाट पाहत बसला असतो. ती खूप मनसोक्त खाते. जेव्हा राणीला ह्या देवळाचे गुपित कळते, तेव्हा तिला खूप खूप राग येतो आणि ती सैनिकाना मोराला पकडून मारायला सांगते.राजकन्या जेव्हा परत देवळात जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "अगं तायडे-मायडे, रडू नकोस  ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला राणी खूप छळते ना? आता नीट ऐक मी काय सांगतोय ते. आपल्या राणी-आईला बाळ होणार आहे, हे तुला ठाउक आहेच. पण तुला हे माहित नाही, कि बाळ होयच्या दोन दिवस आधी आपले बाबा महालात परतणार आहेत. त्यांच्या समोर, राणी तुला खूप प्रेम देइल. काही बोलू नकोस. मग राणीच्या पोटी मी जन्म घेउन परत तुझा भाऊ म्हणून येइन. बारश्याच्या दिवशी आजू-बाजू च्या नगरातले राजा-राणी वा बरेच नातेवाईक येतील. माझे नाव ठेवायच्या वेळी, जेव्हा मला पाळण्यात राणी ठेवेल, तेव्हा मी खूप जोर-जोरात रडेन आणि थांबणारच नाही. मग तू मला मांडीत घे आणि ही अंगाई गा. मी लगेच गप्प होईन आणि झोपेन. मग तुला सगळे विचारतील कि हे की गाणं आहे. आणि तेव्हा तू सगळ्याना आपली गोष्ट सांग. बाबा युद्धाला गेल्या पासून ते आजवर."
राजकन्या भावाला वाचन देते कि त्याने सांगितल्या प्रमाणे ती वागेल. 

राजा परत येतो, राणीच राजकन्येसाठी खोट प्रेम ओतू जात. राजाला छोट्या राजकुमारच्या मृत्यूचे समझते, त्याला दुःख होत. पण येणाऱ्या बाळासाठी तो आतुर असतो. राजकुमाराने सांगितल्याप्रमाणे राणी ला राजपुत्र होतो. बारश्याच्या दिवस येतो...आजू-बाजू च्या नगरातले राजा-राणी वा बरेच नातेवाईक आले असतात. नाव ठेवायची वेळ येते आणि म्हणून राणी बाळाला पाळण्यात ठेवायला जाते...तर काय!!.....बाळ जोर-जोरात रडू लागता...काही केल्या शांत होत नाही. बराच वेळ रडत असतं...राणी जवळ घेते, राजा घेतो....काही केल्या बाळाचे रडणं थांबे ना. मग राजकन्या विचारते, " मी घेउ का बाळाला?".
"अगं आमच्या कडून नाही अवरत, तर तू की करणार?" असा राणी उत्तर देते...पण राजा बाळाला राजकन्येकडे देतो....नि म्हणतो, " बघ तुला त्याला शांत करता येतंय का?"
राजकन्या बाळाला मांडीवर झोपवते, व अंगाई गाउ लागते,

"खडका कोथिंबीर,
नदीतला मासा,
आंब्यावरी कीर,
देवादारी मोर,
झोप रे भौराया आता...........................

आणि गम्मत म्हणजे अशी कि बाळ शांत होतं आणि मस्त झोपून जाता. सगळे आश्चर्यचकित होतात.... राणी तर म्हणते कि राज्कान्येनी जादू केली.....हे काय गाणं आहे, हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो. राजा ही विचारतो कि हे अगळ-वेगळं की अंगाई गीत आहे? 

तेव्हा राजकन्या सगळी गोष्ट सांगते. 

राजाला खूप राग येतो..वाझीरांशी बोलून तो राणीसाठी शिक्षा ठरवतो...."आटपाट नगरीच्या एका चौकात, एक पिंजरा उभा करा आणि राणीला त्यात बंद करा. येणाऱ्या-जाणाऱ्यांनी राणी ला दगड, अंडी मारायची," असा फर्मान काढतो. 

काही दिवसानंतर राजकन्या राजा कडे जाते व राणीला सोडून द्या अशी फिर्याद करते.....

राणीलाही तिची चूक समजते......ती सगळ्यांची माफी मागते...

आणि अश्याप्रकारे सगळे परत महालात सुखाने राहू लागतात.


कणा



0 comments
This is one of my favourite marathi poems.It is one of those, that really help you bounce back on your feet. Do read.

"ओळखलत का सर मला?" पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.


क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
"गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन".

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!"


कवी :  कुसुमाग्रज 

Gyanbaa-Tukaram



0 comments
न्यूजपेपर मधून अथवा टीव्ही channels मधून आपला देश प्रगती करतोय हे कळतं. आपली ८ तक्क्यानी growth होतेय, हे समझ्ता. आपल्या देशाची जनरल परिस्थिती पाहता, एकदम आश्चर्य वाटत. या सगळ्या chaos मध्ये आपण economic growth achieve करतोय, ही एक मोठी गोष्ट आहे, especially या दिवसांमध्ये. आपण असे काय करतोय की ही feat आपण manage केली??

असच एक दिवस मला फरीद ज़कारिया, यांचे भाषण ऐकायला मिळाले. ते 'प्रथम' नामक NGOच्या  गाला इव्हेंट मध्ये की-नोट स्पीकर होते व प्रेक्षकाना contribution देण्याचे अवाहान करत होते. तर त्यांच्या भाषणात, एका pointवर त्यांनी China-India comparison केली आहे.ते म्हणतात, India is succeeding despite its government whereas China is succeeding because of its government. ते म्हणतात की कितीही problems (economic or otherwise) असले तरी त्यांना human response असतोच. Problems macro levelचे असले तरी response हा micro levelवर  असतो आणि तो micro response हळू-हळू देशात बदल आणतो. खरच आहे, त्या शिवाय का आपली ग्रोथ झाली असती!

पण आता प्रश्न असा की त्याला उत्तर नाही.
लोकांनी मतदान करायचं.
लोकांनी सहनशीलता दर्शावाय्ची.
लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला मदतीचा हात द्यायचा.
पण मग सरकारने काय करायचा?
HR च्या भाषेत म्हटले, तर आपल्या सरकारचे KRAs काय आहेत?

लहानपणी आमच्या society च्या मैदानात संत ज्ञानेश्वर उत्सव साजरा होयचा. वारकरी ठेक्यात नाचायचे. ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम. जसे लोक वाढत जायचे, तसा आवाज मोठा होत जायचा....पण वारकर्यांचा घोळका जागच्या जागीच नाचत असायचा....ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.....त्यांचा घोळका कधी पुढे हललाच नाही, अथवा कधी हलला, तरी अगदी हळू-हळू.

ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.....

तशी काहीशी आपली परिस्थिती झाली आहे का?
नेत्यांचा आवाज मोठा, आकडाही मोठा......पण जागच्याजागी चालूच आहे ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम!!
मुंबई ला शंघाई बनवणार
चोवीस तास पाणी आणि वीज मिळणार
मोठे रास्ते, better law and order.
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.........

बेधड़क आणि illegal  constructions पाडणार.
वाढत्या महागयिला रोखणार
Bureaucracy आणि corruptionला लगाम लावणार.
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.....

आणि या सर्व गदारोळात जातीय वाद आहेतच.
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम......

काहीच होत नाही असं वाटत. नैराश्य येतं. हो! देशाच्या बाहर राहून, आपली दुर्गति होत आहे आणि ती कशी होत आहे, हे चांगलच नीट दिसतं. जेव्हा इतर देशाचे नागरिक आपल्याला प्रश्न विचारतात की तुमच्या देशात सरकार basic सोयी देत नाही का? तेव्हा बोचतं, लाज वाटते आणि या सर्व politiciansना एक खाडकन भड्कावून द्यावीशी वाटते.
पण मग ज़करियांच आपल्या देशाबद्दलचे वाक्य आठवत. खरं आहे ते. India is succeeding despite its government . पण आता आपण कुठच्या बाजुनी पाहिचा ह्याच्याकड़े?

की वाह! Politiciansना न जुमानता लोकं प्रगति पथावर जात आहेत!!!
की  आपला सरकार ineffective आहे अस आपणच आपलं समजून घेऊन  दुसरीकडे migrate होयचा?
का  आपण डोळे बंद करून आणि माना खाली घालून गप गुमान आपली कामं करत रहायची आणि नेत्यांचा ठेका चालू द्यायचा?
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.........
ग्यानबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम.........

PS.
Please do hear Fareed Zakaria speak. Its a 25 mins speech.
http://ishare.rediff.com/video/news-politics/india-is-succeeding-despite-its-government-fareed-zakaria/930384
older post

Recent Comments

Search This Blog