twitter button

आठवणीतल्या गोष्टी: खडका कोथिंबीर (भाग 1)



2 comments
आजी कडून गोष्ट ऐकण्याची  मज्जा वेगळीच आहे बुवा!!  कधी घास भरवतांना, कधी रात्री थोपटत, कधी बागेत झोपाळ्याला झोका देतांना!

शांताईने (माझी आजी) मला बऱ्याच गोष्टी ऐकवल्या. गोष्टी सांगतांना शांताई मला एका वेगळ्याच दुनियेत, अडव्हेनचर ट्रीप वर, न्यायची. एक जादूची नागरी, राजा, त्याची आवडती राणी आणि नावडती राणी, प्रजा, राजकन्या-राजपुत्र, युद्ध, खजिना, आणि या सगळ्यांना बांधणारा एक अफलातून जादूचा धागा.

अशीच एक गोष्ट तिने सांगितलेली, मला अजून आठवते.

खडका कोथिंबीर

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.

आटपाट नगरीचा एक राजा होता. राजा शूर-वीर अन दयाळू होता. त्याच्या प्रजेचेही त्याच्यावर खूप प्रेम होते. अश्या या राजाची एक सुंदर राणी होती. राणी दिसायला इतकी सुंदर, जणू एक परीच ती! जितकी दिसायला सुंदर, तितकीच स्वभावाने निर्मळ. त्यांना दोन गोड छोटी मुलं...मोठी  राजकन्या आणि धाकटा राजकुमार!! दोघेही आई-बाबा आपल्या मुलांवर खूप प्रेम करीचे. राणी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगायची, गाणी शिकवायची आणि भरपूर खेळायची त्यांच्याशी.

पण एके दिवस असे होते कि राणीला बरे नाहीसे होते. वैद्यबुवा येतात, औषधे देतात, काढे पाजतात, तरी राणी काही बरी होईना.  महालात नैराश्य घर करून बसतं. राजकुमार आणि राजकन्या काय! कोणालाच काळात नव्ह्तं कि राणी ला काय झालय. अशेच कघी दिवस गेले. आणि एके दिवस राणी देवाघरी गेली. सारी आटपाट नगरी दुःखात बुडते. राजा तर तहान-भूकही विसरतो. नुसताच विचार करत बसायचा. राजकुमार आणि राजकन्येला समजेना कि आपली आई आपल्याला सोडून देवाकडे का गेली? बरेच दिवस असे गेले.

पण राज्याचा कार्यभार परत सुरळीत चालू व्हायलाच हवा! राजा आणि त्याच्या मुलाचं आयुष्यही पुढे नीट जावं म्हणूनच तर दरबारातल्या वझीरांनी राजाला दुसरा लग्न करायला सांगतात. आणि नवीन राणी राजमहालात येते. राजकुमार आणि राजकन्येला नवीन आई मिळते.

ही नवीन राणी देखील दिसायला सुरेख होती. पण स्वार्थी होती. तिला  राजकुमार आणि राजकन्येचा उगाच खूप राग यायचा. सगळे दरबारी, राजकुमार आणि राजकन्येवर खूप माया करायचे. हे तिला सहन नाही व्हायचे. राजा समोर त्यांच्यावर  माया करायची, पण मनातल्या मनात, त्यांना महालातून बाहेर कसं काढून टाकता येईल असा विचार करायची.

एके दिवशी राणीला समझते कि ती आई होणार आहे. मग तर तिला राजकुमार आणि राजकन्येचा आणखी राग येउ लागतो. काही दिवसातच राजा एक युद्ध लढायला निघून जातो. तर राणी छोट्या राजकुमार आणि राजकन्येला त्रास द्यायला सुरुवात करते. त्यांना उपाशी ठेवते, बरीच कामे करायला लावते....जणू ते राजकुमार व राजकन्या नसून, कोणी महालातले नोकर आहेत. आणि मग एके दिवशी राणी निश्चय करते, कि राजकुमार आणि राजकन्येला मारून टाकायचे. म्हणजे राणीला जे बाळ होईल, त्याला सगळ राज्य मिळेल ना! एके दिवशी ती राजकुमार आणि राज्कान्येसाठी खाउ बनवते...पण त्याच्यात विष मिसलावते. राजकुमाराला खूप भूक लागली असते, म्हणून तो ताई ला विचारतो, "मला कि नई खूप भूक लागली आहेय ती...मी खाउ का तुझा खाउ?". हे ऐकून राजकन्या आपलं वाटा त्याला देते....पण खातच, राजकुमार निपचित पडतो....ना हलत न चालत.

महाल परत  दुःखात बुडतो....राजकन्या एकटी पडते...राजाही दूर देशी युद्ध-भूमीवर असतो.......पण राणीला बरच वाटत असतं. ती विचार करते कि आता राजकन्येला इतका त्रास देउया कि ती स्वतः पळून जाईल. राजकन्या आता दासी सारखी राहू लागते. कोणी तिच्या बाजूने काही बोलले, तर त्याला काळ-कोठडीत बंद करते. सगळे घाबरून असतात राणीला. एके दिवशी राणी फर्मान काढते कि राजकन्येचे जेवण बंद करायचे, कारण ती नीट काम करत नाही. राजकन्या खूप रडते. पण कोणी काही बोलू शकत नाही, व करू शकत नाही.

त्या रात्री राजकन्येच्या स्वप्नात येतो तिचा भाऊ.......छोटा राजकुमार!
तो म्हणतो, "ताई तुला भूक लागली कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे एक मोठा खडक आहे....मी कोथिंबीर म्हणून उगवेन. तू खा."

राजकन्येला खूप भूक लागली असते...ती, भवानी सांगितल्या प्रमाणे दररोज खडका जवळ जाउ लागते....आणि खरचकी!!!! तिथे कोथिंबीर असते. ती खूप मनसोक्त खाते. बरेच दिवस होतात राजकान्येत काही बदल दिसत नाही म्हणून राणी तिच्या पाठी गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतका खाते कि अजून टुनटुणित आहे?

जेव्हा राणीला सगळा हा कोथिम्बीरीचा प्रकार कळतो, तेव्हा तिला खूप खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो खडक व ती कोथिंबीर, दोन्ही जाळून टाकायचा आदेश देते. राजकन्या जेव्हा परत जाते तीठेय खायला तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.

त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, ताई-बाई, मला तुझी खूप खूप काळजी वाटते ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे मी मासा बनून तुज्या कडे तलावातले खाद्य घेउन येईन....तू खा."

(Continued on to the next post)

2 comments:

s at: Mar 25, 2010, 2:50:00 PM said...

Nice... waiting for you to complete the story. Kharach mala majhya ajji chi athwan aali. Miss those days :(

Nandini Chhatre at: Mar 25, 2010, 2:56:00 PM said...

Hi,
Have posted the second part. Take a look.
:)
Cheers
--
Nandini

Post a Comment

newer post older post

Recent Comments

Search This Blog