Keukenhof Gardens of Holland are popular across the world for their flowers and beauty. One trip to this garden will revive your tired souls and freshen up your minds.

Click here to know more about the
Keukenhof garden or click the logo to visit the official site.
दिवस सरला रात्र झाली,
खूप-खूप खेळून मुकल्या दमली.
खाऊन गरम वरण-भात-तूप,
मुकल्या-बुन्कुस झाले गुडुप.
पण एकाएकी काय झाले!
मुकल्याने डोळे उघडले.
उठवले पटकन बुन्कुसला,
घर नाही, ही तर बाग आहे, फुलेच-फुले आजुबाजूला.
पटकन उठून बघतात दोघे, बसले आहेत मऊ बिछान्यावर,अन जवळ उभ्या छोटया बाहुल्या, नजर आहे त्यांच्यावर.
पण नाहीत या साध्या बाहुल्या, त्यांना आहेत दोन पंख,
निळे-निळे डोळे, अन गळ्यात घालतात शंख.
बाहुल्या म्हणती, "आम्ही पऱ्या, करतोय तुमचे स्वप्न खरे,
कालच पार्थना केलीतना, तुम्ही देवबाप्पा कडे"!
देवा..........मोठी बाग हवी ज्यात असतील न्यारी फुले,
झाडे असतील, जादू असेल अन असतील फुलपाखरे.
"तर आमच्या छोट्या बागेत या आणि आवडेल तिथे जा,
पण सूर्य उगवायच्या आत, इथे परत या".
मुकल्या-बुन्कुस प्रचंड खुश, उठले उड्या मारत,
बागेत भटकू लागले कधी चालत-कधी पळत.
"मोठी मोठी ही फुले कोणती"?, मुकल्या विचारे बून्कुसला,
"ह्यांना म्हणतात ट्युलिप मुकल्या, रंग यांचा खूपच न्यारा".
"आणि ही कोणती पिवळी फुले ज्यांच्या भोवती पाखरे करती किलबिल"?
"तलावात स्वतःचे रूप पाहणारी, नाव ह्यांचे डॅफ्फोडिल".
"बुन्कुस, ही फुले कोणती?, ह्यांना ठेवले का काचेच्या घरात"?
"ग्रीन हाउस आहे हे मुकल्या अन ऑर्किड येथे वाढतात".
किती छान फुले इथे, बागेत दुसरे दडले काय?
एक मोठा जूक बॉक्स, गाणी ज्याच्यात थांबत नाय.
आहेत घनदाट झाडे, जी देतात बागेला सावली,
याच सावलीत वावरतात ही परिलोकातील मंडळी.
आहे एक सुंदर तलाव, ज्याच्यात आहे भरपूर पाणी,
मासे, बेडूक, बदके, बगळे, सगळे मिळून गातात गाणी.
"एवढी मोठी बाग बुन्कुस, हे कसे संभाळतात"?
बुन्कुस म्हणे, "का नाही! रात्री जादू होते तलावात".
"बगळ्यांची राणी येते इथे माणसाच्या रुपात,
जादूची छडी फिरवत करते बाग स्वच्छ एका मिनिटात"
"एवढच नव्हे मुकल्या, जेव्हा पऱ्या आपला शंख वापरतात,
शिट्टी सारखा फुंकून पक्षी-प्राण्यांना रांगेत उभे करतात.
सगळे आपली-आपली कामे एकदम चोख बजावतात,
कोणी प्रार्थना केली, की आपल्या सारख्यांना येउन भेटतात".
सूर्य उगवायची झाली वेळ , दोघे लागले बिछान्याकडे परतायला,
विचार करत कि एक बाग अशी बनवूया आपल्याला खेळायला!
मउ बिछान्यावर झोपेपर्यंत त्यांचा प्लॅनही ठरला,
अन थोड्याच वेळात घड्याळाचा गजर वाजला.
आई आली उठवायला, अन मुकल्या म्हणाली "दोन मिंट,
उठायचं नाही आई मला! दमले इथे येई पर्यंत".
"अगं! काय झालं दमायला"? आई विचारी जवळ घेऊन,
"चटकन उठ अन पटकन दूध पी, दम जाईल पळून".
"नाही गं आई, काल गेले होते बुन्कुस सवे एका बागेत,
एवढी मोठी बाग बघून खुश झाली तब्बेत".
"अग्गो बाई! अश्या कुठल्या जादूच्या बागेत गेली होतीस आपल्याआप"?
"हॉलंड मधली सुंदर बाग ही आई, नाव तिचे क्युकेनहॉफ"!