त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, ताई-बाई, मला तुझी खूप खूप काळजी वाटते ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या तलावा कडे ये. तिथे मी मासा बनून तुज्या कडे तलावातले खाद्य घेउन येईन....तू खा." ती, भवानी सांगितल्या प्रमाणे तलावा जवळ जाते....आणि खरच!!!! तीथे एक सोनेरी रंगाचा मासा तोंडात तलावातली वनस्पती घेउन काठाजवळ थांबला असतो. ती खूप मनसोक्त खाते. राजकन्येची ही तलावाची दररोजची वारी पाहून राणीला संशय येतो; आणि म्हणून राणी तिच्या (राजकन्येच्या) पाठी परत गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतके खाते कि अजून टुनटुणित आहे? जेव्हा राणीला सगळा हा माश्याचा प्रकार कळतो, तेव्हा तिला खूप-खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो मासा पकडायला सांगते. राणी स्वतः मासा शिजवून लोकांना खायला घालते.
राजकन्या जेव्हा परत तलावा जवळ जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते. त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, माझे गोड ताये, काळजी नको करूस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या बागेत ये. तिथे एक मोठे आंब्याचे झाड आहेय. तीठेय खालच्या फांदीवर मी पोपट-रुपात असेन. तुला खायला फळं आणेन. तू खा."
राजकन्या, भावानी सांगितल्या प्रमाणे आंब्याच्या झाडाकडे जाते....आणि खरच!!!! तीथे एक सुंदर पोपट अपुल्या चोचीत फळं घेउन वात पाहत बसला असतो. ती खूप मनसोक्त खाते. बरेच दिवस होतात राजकान्येत परत काही बदल दिसत नाही म्हणून राणी तिच्या पाठी परत गुप्तहेर लावते...ती काय करते, कुठे इतका खाते कि अजून टुनटुणित आहे? जेव्हा राणीला ह्या पोपटाबद्दल समझतं, तेव्हा तिला खूप-खूप राग येतो आणि ती सैनिकाना तो पोपट पकडून मारायला सांगते.राजकन्या जेव्हा परत बागेत जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.
त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "एss, माझे तायडे, रडू नकोस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला भूक लागली ना, कि आपल्या महालाजवळच्या देवळात ये. तिथे मी मोर बनून तुझ्याकडे मंदिरातला घेउन येईन....तू खा."
भावानी सांगितल्या प्रमाणे राजकन्या देवळात जाउ लागते.....आणि खरच!!!! तीथे एक सुंदर मोर अपुल्या चोचीत देवाचा प्रसाद घेउन राजकन्येची वाट पाहत बसला असतो. ती खूप मनसोक्त खाते. जेव्हा राणीला ह्या देवळाचे गुपित कळते, तेव्हा तिला खूप खूप राग येतो आणि ती सैनिकाना मोराला पकडून मारायला सांगते.राजकन्या जेव्हा परत देवळात जाते तेव्हा तिला काहीच सापडत नाही. ती निराश होउन खूप रडते.
त्या रात्री राजकुमार परत तिच्या स्वप्नात येतो वा म्हणतो, "अगं तायडे-मायडे, रडू नकोस ग. मला माहित आहे तुला त्रास होतोय किती ते. तुला राणी खूप छळते ना? आता नीट ऐक मी काय सांगतोय ते. आपल्या राणी-आईला बाळ होणार आहे, हे तुला ठाउक आहेच. पण तुला हे माहित नाही, कि बाळ होयच्या दोन दिवस आधी आपले बाबा महालात परतणार आहेत. त्यांच्या समोर, राणी तुला खूप प्रेम देइल. काही बोलू नकोस. मग राणीच्या पोटी मी जन्म घेउन परत तुझा भाऊ म्हणून येइन. बारश्याच्या दिवशी आजू-बाजू च्या नगरातले राजा-राणी वा बरेच नातेवाईक येतील. माझे नाव ठेवायच्या वेळी, जेव्हा मला पाळण्यात राणी ठेवेल, तेव्हा मी खूप जोर-जोरात रडेन आणि थांबणारच नाही. मग तू मला मांडीत घे आणि ही अंगाई गा. मी लगेच गप्प होईन आणि झोपेन. मग तुला सगळे विचारतील कि हे की गाणं आहे. आणि तेव्हा तू सगळ्याना आपली गोष्ट सांग. बाबा युद्धाला गेल्या पासून ते आजवर."
राजकन्या भावाला वाचन देते कि त्याने सांगितल्या प्रमाणे ती वागेल.
राजा परत येतो, राणीच राजकन्येसाठी खोट प्रेम ओतू जात. राजाला छोट्या राजकुमारच्या मृत्यूचे समझते, त्याला दुःख होत. पण येणाऱ्या बाळासाठी तो आतुर असतो. राजकुमाराने सांगितल्याप्रमाणे राणी ला राजपुत्र होतो. बारश्याच्या दिवस येतो...आजू-बाजू च्या नगरातले राजा-राणी वा बरेच नातेवाईक आले असतात. नाव ठेवायची वेळ येते आणि म्हणून राणी बाळाला पाळण्यात ठेवायला जाते...तर काय!!.....बाळ जोर-जोरात रडू लागता...काही केल्या शांत होत नाही. बराच वेळ रडत असतं...राणी जवळ घेते, राजा घेतो....काही केल्या बाळाचे रडणं थांबे ना. मग राजकन्या विचारते, " मी घेउ का बाळाला?".
"अगं आमच्या कडून नाही अवरत, तर तू की करणार?" असा राणी उत्तर देते...पण राजा बाळाला राजकन्येकडे देतो....नि म्हणतो, " बघ तुला त्याला शांत करता येतंय का?"
राजकन्या बाळाला मांडीवर झोपवते, व अंगाई गाउ लागते,
"खडका कोथिंबीर,
नदीतला मासा,
आंब्यावरी कीर,
देवादारी मोर,
झोप रे भौराया आता...........................
आणि गम्मत म्हणजे अशी कि बाळ शांत होतं आणि मस्त झोपून जाता. सगळे आश्चर्यचकित होतात.... राणी तर म्हणते कि राज्कान्येनी जादू केली.....हे काय गाणं आहे, हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो. राजा ही विचारतो कि हे अगळ-वेगळं की अंगाई गीत आहे?
तेव्हा राजकन्या सगळी गोष्ट सांगते.
राजाला खूप राग येतो..वाझीरांशी बोलून तो राणीसाठी शिक्षा ठरवतो...."आटपाट नगरीच्या एका चौकात, एक पिंजरा उभा करा आणि राणीला त्यात बंद करा. येणाऱ्या-जाणाऱ्यांनी राणी ला दगड, अंडी मारायची," असा फर्मान काढतो.
काही दिवसानंतर राजकन्या राजा कडे जाते व राणीला सोडून द्या अशी फिर्याद करते.....
राणीलाही तिची चूक समजते......ती सगळ्यांची माफी मागते...
आणि अश्याप्रकारे सगळे परत महालात सुखाने राहू लागतात.
0 comments:
Post a Comment