twitter button


0 comments
This is a poetic version of a Varsha Usgaonkar-Ashok Saraf movie.
Any resemblances with living or dead is purely co-incidental.
  

गजर वाजला,

चटुक उठला,

चटकन दात घासायला गेला.

अंघोळ केली, दाढी झाली,

कामाची ही घटिका आली.


संध्या येता चटुक येई,

नाश्ता करून पाय पसरी.

रात्रौ होता पोटोबा बोले,

भरपूर जेवून मिटुया डोळे.


चटुक ची होती एक बायको,

म्हणायचे तिला आय्गो-बाय्गो.


गजर वाजे,

आय्गो उठे,

सकाळपासून धांदल उडे.

चहा, जेवण, नाश्ता करी,

पण संपे ना काही चटुकची यादी.


चटुक म्हणे, "काय असते घरी काम?

थोडासा स्वयंपाक, मग तर आराम."

दिसे ना त्याला घर टाप-टीप,

इस्त्रीचे कपडे पण घडी केलेले नीट.


आय्गो बाय्गो त्याला सांगे,

"जो गावभर फिरतो तो काय समजे?"


"कामाच्या नावाखालि काय बाई करतो,

ना घाम, ना त्रास तुझ्या चेहऱ्यावर दिसतो".


हैराण होऊन आय्गो म्हणाली,

कळूदे चटुकला घरातली कहाणी.

स्वप्नातल्या परीने काडी फिरवली,

चटुक झाला आय्गो, न बाय्गो चटुक झाली.


सकाळ झाली, गजरानेही हाक मारली,

अन चटुकच्या आधी आय्गो उठली.

स्वप्नं आठवून खुदकन हसली,

बाहेर जायची संधी मिळाली.


अंघोळ केली दाढी झाली,

कामाची ही घटिका आली.

काम नव्हते सोपे ते,

शेतावरती नंगारायचे.

दम लागे , त्रास होई,

दुपारला तर घामहि येई.


संध्या होता चटुक आली,

आल्या-आल्या झोपून गेली.

ही तर बाजू आय्गो-ची,

अशीच कशी गोष्ट चटुकची.


आय्गो म्हणून चटुक उठला,

चहा करताना चटका लागला.

जेवण न्याहरी,

आवरा आवरी,

बझार हाट अन धुणी भांडी.


सारं काही जमेना,

सारं काही उमजेना,

पण दिवस सरता दमला बाई.

न आय्गो येता झोपला बाई.


स्वप्नात दोघांच्या परी आली...

दोघांनी ही क्षमा मागितली.

परी ने फीरवली जादू ची काडी,

अन झटकन-पटकन सकाळ झाली.


गजर वाजला,

चाटुक उठला,

आय्गो ने ही डोळा उघडला.

एक मेकास मदत केली,

अन दिवस चटकन निघून गेला.

आता थोडे बदल्ले होते,

दुसर्यांचे कष्ट समजत होते.


अशी ही छोटीशी गोष्ट,

सांगा सर्वांना स्पष्ट.

0 comments:

Post a Comment

newer post older post

Recent Comments

Search This Blog